Hinjawadi Crime News : हिंजवडीतून दहा लाखाचे बनावट मद्य जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

एमपीसीन्यूज : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातील हिंजवडी परिसरामध्ये धडक कारवाई करत बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला आहे. तसेच तब्बल दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली.

नाग्या डाया चावडा (वय 37) असे आरोपीचे नाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील पांडव नगर येथील साखरे वस्तीमध्ये हा बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरु होता. यामध्ये उच्च प्रतीच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून त्या विकल्या जात होत्या.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत या ठिकाणाहून उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या भरलेल्या 115 बाटल्या, 300 रिकाम्या बाटल्या, 180 लेबल, 400 बॉटल कव्हर असा एकूण दहा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी नाग्या डाया चावडा याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस. आर. दावेराव करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.