Drugs Case : शाहरुख पुत्र आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयाने जामीन नाकारला

एमपीसी न्यूज – कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती. जामिनावर आज न्यायालयात निर्णय देण्यात आला. विशेष न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा सुद्धा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढला असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे.

आर्यनच्या जामिनावर विशेष नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कोर्टाने बुधवारी निकाल दिला. आर्यन सोबत, क्रूझमधून आणखी सात लोकांना अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. जामिनावर न्यायालयात गेल्या सुनावणी दरम्यान एनसीबीने म्हटले की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेत होता असे पुरावे दर्शवतात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने असेही म्हटले होते की आर्यनच्या ताब्यातून काहीही सापडले नाही, पण त्याच्या चॅटमधून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे.

आर्यन खानच्या वकिलांनी ते उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता आर्यन खानच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतील. काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.