Maharashtra : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

एमपीसी न्यूज : दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णायाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. (Maharashtra) पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला कायम ठेवण्यात येणार आहे, असे कोर्टानं सांगितलं आहे.

निवडणूक आयोगानं शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णायावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज यावर सुनवणी झाली. यामध्ये दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला.

Pimpri-Chinchwad : मिसींग मॅन जाधव यांचे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ट्विटरद्वारे कौतुक

सुप्रीम कोर्ट याप्रकरणाची पुढील सुनावणी घेत नाही, तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आधारावर व्हीप काढला तर ठाकरे गटाला लागू होणार नाही.(Maharashtra) ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात व्हीप काढणार नाही, अपात्र करणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दिले आहे.

यावर कपिल सिब्बल म्हणाले की, हा फक्त व्हीपपुरता मर्यादीत मुद्दा नाही. कारण अनेक अर्थांनी हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण व्हीप बाजूला ठेवला तर पक्षाच्या संपत्ती आणि मालमत्तेवर ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाला संपूर्ण स्थिगिती द्यावी.

दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना संरक्षण

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात व्हीप जारी करण्यात आला, तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात, अशी भीती ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. मात्र शिंदे गटाने पुढील दोन आठवड्यांसाठी असा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आगामी दोन आठवड्यांसाठी ठाकरे गटातील आमदारांना एका प्रकारे संरक्षणच मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.