Covid 19 : राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये मास्क अनिवार्य; नवीन कोविड-19 टास्क फोर्सची माहिती

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सने खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये फेस मास्कचा वापर अनिवार्य करण्याबाबतची शिफारस केली आहे.(Covid 19) राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याने नव्याने नियुक्त केलेल्या उच्च-स्तरीय टास्क फोर्समार्फत A(H1N1) आणि H3N2 विषाणूंसारख्या समवर्ती संसर्गावर बारकाईने लक्ष दिले जात आहे.

राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, “आम्ही केवळ कोरोना व्हायरसवर नाही, तर  कोविड-19 वर परिणाम करणारे इतर सह-संबंधित संसर्गावरही नजर ठेवणार आहोत.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात कोविड-19 परिस्थितीबाबत प्रशासकीय आणि तांत्रिक आढावा बैठकीत शनिवारी नऊ सदस्यीय नवीन टास्क फोर्सची घोषणा करण्यात आली. डॉ साळुंखे टास्क फोर्सच्या अध्यक्षस्थानी आहेत तर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ; पुणे स्थित डॉ आर आर गंगाखेडकर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीज विभागाचे माजी प्रमुख; डॉ सी जी पंडित ICMR चे राष्ट्रीय अध्यक्ष (मेडिकल); आणि डॉ. राजेश कार्यकर्ते, जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्र समन्वयक सदस्य आहेत.

या वर्षी जानेवारीपासून राज्यात 86 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली आहे, त्यापैकी 72 टक्के मृत्यू 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे झाले आहेत. मृतांपैकी सुमारे 84 टक्के लोकांना कॉमोरबिडीटीज होते. एकूणच, महाराष्ट्रात सध्या कोरोनाची 6,167 सक्रिय प्रकरणे आहेत असून अधिकृत आकडेवारीनुसार, Omicron XBB.1.16 या वेरीयंटची लक्षणे रूग्णांमध्ये दिसून येत आहेत. साळुंखे म्हणाले, “राज्यात सध्या कोविड-19 प्रकरणांची संख्या कमी होत आहे आणि मेच्या मध्यापर्यंत घट होण्याची अपेक्षा आहे.”

Pune News : क्लेफ्टचा उपचार करा आता मोफत!

 

बैठकीत, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) कानिटकर यांनी देखील निदर्शनास आणून दिले की एकूणच कोरोना आकडेवारीचा वाढता ट्रेंडमध्ये मेच्या मध्यापर्यंत घसरण होईल. “तथापि, आमच्या आधीच्या मॉडेलिंग अभ्यासानुसार, आम्ही असे निरीक्षण केले आहे की अशा ठिकाणी/क्षेत्रांमध्ये विषाणूचा प्रसार सामान्यतः दोन ते तीन आठवडे जास्त दिसून येतो.

 

“संक्रमणांची वाढ ही इतर इन्फ्लूएंझा विषाणूंसारखीच आहे. विषाणूची जगण्याची वृत्ती अधिक मजबूत आहे त्यामुळे संसर्ग सौम्य असू शकतो, परंतु वेगाने पसरतो आणि म्हणूनच WHO ने याला Variant of Interest म्हटले आहे,”  असं कानिटकर म्हणाले.

 

म्हणूनच समितीच्या सदस्यांना असे वाटले की रुग्णालयांमध्ये (Covid 19) मास्त वापरणे अनिवार्य केले जावे, विशेषत: नियमित तपासणीसाठी येणाऱ्या वृद्ध व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो.  “मास्कच्या वापरामुळे संसर्गाची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे,”

 

ही समिती उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींसाठी पुराव्यावर आधारित विशिष्ट उपचार मार्गदर्शक तत्त्वांवर (राष्ट्रीय ICMR प्रोटोकॉलचे पालन करताना) काम करेल आणि दीर्घ कोविड प्रकरणांच्या व्यवस्थापनावरील आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्याला तयार करेल. साळुंखे म्हणाले की, त्यांचे लक्ष नुकत्याच झालेल्या मॉक ड्रिल दरम्यान आढळलेल्या रुग्णालयांवरही केंद्रित आहे.

 

“90 टक्के रुग्णालयांनी चांगली कामगिरी केली आहे… तफावत ओळखल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे रुग्णांच्या चांगल्या सेवेच्या दृष्टीने याकडे पाहावे लागेल,” साळुंखे म्हणाले, इतर क्षेत्रांमध्ये बूस्टर लसीच्या डोसची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

 

दरम्यान, टास्क फोर्स प्रामुख्याने चिंता दूर करेल आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित नवीन धोरणे विकसित करेल, असे साळुंखे म्हणाले. “आम्ही या क्षेत्रात काही प्रशंसनीय काम केलेल्या (Covid 19) डॉक्टरांनाही सहकारी म्हणून निवडणार आहोत,” ते म्हणाले की, बी जे मेडिकल कॉलेज, पुणे येथील औषध विभागाचे माजी प्रमुख डॉ डी बी कदम हे देखील समितीचा भाग असतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.