Covid-19 Vaccine Big News: दोन भारतीय लशी मानवी चाचणीसाठी सज्ज, 1000 स्वयंसेवक तयार

Covid-19 Vaccine Big News: Two Indian vaccines ready for human testing, 1000 volunteers ready जगातील 60 टक्के लशी भारतात तयार होतात आणि त्यामुळे भारत कोविड-19 च्या लशीसाठी खूप महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले.

एमपीसी न्यूज- देशातील दोन कंपन्या कोरोना लस तयार करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी 1000 जणांवर या लशीची चाचणी घेत आहेत. लस तयार करत असलेल्या भारत बायोटेकने आयसीएमआरबरोबर याची मनुष्यावर चाचणी सुरु केली आहे. आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी माध्यमांशी संवाद साधला. जगातील 60 टक्के लशी भारतात तयार होतात आणि त्यामुळे भारत कोविड-19 च्या लशीसाठी खूप महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले.

डॉ. भार्गव म्हणाले की, भारतातील दोन कंपन्यानी लस विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी या लशीचा उंदीर आणि सशांवर चाचणी केली आणि ती यशस्वीही ठरली. याची माहिती डीसीजीआयला पाठवण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांना या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. भारतात लशीच्या चाचणीसाठी 1000 स्वयंसेवक तयार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

बलराम भार्गव म्हणाले की, जग लस तयार करण्यात मग्न आहे. रशियाला सुरुवातीच्या टप्प्यात यशही मिळाले आहे. इतर अनेक देशांमध्ये वेगाने काम सुरु आहे. आपल्यालाही लस तयार करण्याची प्रक्रिया वेगाने करावी लागणार आहे.

चीननेही आपल्या कार्यक्रमांना वेग आणला आहे. अमेरिका आणि ब्रिटनही लस तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. जगाला पुरवल्या जाणाऱ्या 60 टक्के लशी या भारतात तयार होतात. लशीचा पुरवठा करण्याच्या क्षेत्रात भारताची भूमिका महत्त्वाची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.