Bhosari Corona News : महापालिका शाळा, मंगल कार्यालयात कोविड रुग्णालये सुरू करावीत – रवी लांडगे

0

एमपीसी न्यूज – भोसरी गावजत्रा मैदान व सांगवी येथील पी.डब्लू डी. मैदानावर प्रस्तावित जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांचे कोट्यवधी रुपये उधळण्याऐवजी महापालिकेच्या मोठ्या शाळा तसेच शहरातील मंगल कार्यालय,खाजगी शेड याठिकाणी अशी कोविड रुग्णालये तातडीने सुरु करावीत, अशी मागणी भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक लांडगे यांनी म्हटले आहे की,भोसरी गावजत्रा मैदान व सांगवी येथील पी.डब्लू डी. मैदानावर प्रस्तावित जम्बो कोविड रुग्णालय उभरण्याचे नियोजन सुरू आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतील. नागरिकांच्या आरोग्यासाठी पैसे गेले तरी हरकत नाही. नागरिकांचे पैसे नागरिकांसाठी वापरलेच पाहिजेत. पण, जम्बो कोविड सेंटरमध्ये लूट होत असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

जम्बो कोविड उभे करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यावर करोडो रूपांची उधळपट्टी होणार आहे. त्याऐवजी महापालिकेच्या मोठ्या शाळा, शहरातील मंगल कार्यालय,खाजगी शेड याठिकाणी अशी रुग्णालये तातडीने सुरु करावीत. त्यातून करोडो रुपयांची उधळपट्टी थांबेल,तसेच नागरिकांना वेळेत उपचार मिळतील.

सामान्य नागरिकांकडून जम्बो कोविड सेंटर मध्ये ICU बेडसाठी एक लाख रुपये उकळण्याचा प्रकार नुकताच उघडकिस आला.असे प्रकार खाजगीकरण केल्यामुळे होतात, ही बाब लांडगे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली तसेच नवीन जम्बो कोविड सेंटर निविदा रद्द करावी, अशी सूचनाही लांडगे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment