Covid Nasal Vaccine : नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना लस CoWin ॲपवर उपलब्ध

एमपीसी न्यूज – भारत बायोटेक कंपनीची नाकाद्वारे दिली जाणारी iNCOVACC ही कोविड लस (Covid Nasal Vaccine) आता केंद्र शासनाच्या CoWin ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीकडून या लसीची किंमत आणि वापरासाठी उपलब्धता पुढील आठवड्यात जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीच्या नेझल कोरोना वॅक्सिन (Covid Nasal Vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या आपात्कालीन वापराला आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली होती. त्याआधी DGCI ने ही लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.

Pimpri News: पंतप्रधान कार्यालयाकडून ‘मन की बात’साठी पिंपरी- चिंचवड शहराची दखल

भारत बायोटेक कंपनीच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला (Covid Nasal Vaccine) बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. भारत बायोटेकची इंट्रानेझल कोविड लसीचा पर्याय कोविन ॲपवरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ही नेझल कोरोनो वॅक्सिन खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यात येईल. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होईल.

नाकाद्वारे कोरोना लस म्हणजे काय?

नेझल कोरोना वॅक्सिन (Covid Nasal Vaccine) म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस आहे. यासाठी तुम्हाला इंजेक्शन घेण्याची गरज नाही. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. ही लस त्वचेतून शरीरात प्रवेश करते आणि विषाणूविरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करते.

या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना ट्रायपॅनाफोबिया आहे, म्हणजेच सुयांची भीती वाटते. अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन उत्तम पर्याय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.