Covid Test News : खुशखबर ! आता करा घरबसल्या कोविड टेस्ट

एमपीसी न्यूज : कोविड चाचणी करण्यासाठी आता तुम्हा रुग्णालयात जाण्याची किंवा रांगा लावण्याची गरज नाही. कारण आता घरबसल्या कोविड चाचणी करणे शक्य झाले आहे. पुण्यातील ‘माय लॅब डिस्कवरी सोल्युशन लिमिटेड’ या कंपनीने COVISELF (Pathocatch) या किटची निर्मिती केली आहे.

‘आयसीएमआर’ने (ICMR) या टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. या किटच्या मदतीने आता घरबसल्या कोविड चाचणी करणे शक्य झाले आहे. या किटच्या साहाय्याने नाकाद्वारे नमुने तपासणीसाठी घेता येईल. यासाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

दरम्यान, COVISELF हे होम टेस्टिंग ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे. घरी चाचणी करणाऱ्या नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.

Video Link for demonstration video along with illustrated Video In English and Hindi – http://coviself.com/video/

‘ या’ आहेत मार्गदर्शक सूचना

घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरून मोबाईल ॲप डाउनलोड करावे लागेल.

ही चाचणी कंपनीने दिलेल्या म्युन्युअलनुसार करावी.

फक्त लक्षणे असलेल्या नागरिकांना याद्वारे घरीच चाचणी करता येईल. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना ही चाचणी करता येईल.

चाचणी केल्यानंतर मोबाइल ॲपद्वारे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.

घरी चाचणी करणाऱ्यांना टेस्ट स्ट्रीपचा फोटो काढावा लागेल. ज्या मोबाईलवरॲप डाउनलोड केले आहे त्याच मोबाईलवर हा फोटो काढावा लागेल.

मोबाईल फोनवरील डाटा हा थेट आयसीएमआरच्या टेस्टींग पोर्टल स्टोअरवर जाईल.तसेच
रुग्णाची गोपनियता कायम ठेवली जाईल.

या टेस्टद्वारे ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल ते पॉझिटिव्ह समजले जातील आणि त्यांना इतर कुठल्या टेस्टची गरज पडणार नाही.

जे नागरिक पॉझिटिव्ह आढळतील त्यांना होम आयसोलेशनबाबत आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.

लक्षणे असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना RTPCR टेस्ट करावी लागेल.

सर्व रॅपिड अँटिजन निगेटिव्ह असलेल्यांना लक्षणे नसलेले किंवा संशयित कोविड रुग्ण मानले जाईल आणि जोपर्यंत RTPCR टेस्टचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्येच रहावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.