Covishield Vaccine : मोठी बातमी ! सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी

एमपीसी न्यूज- सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘कोविशिल्ड’ या लसीला मान्यता देण्यात आल्याने पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं.

_MPC_DIR_MPU_II

आता सीरमच्या कोविशिल्डला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. दोन जानेवारीला देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे.

कोरोना लसीची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. आता कोविशिल्ड लसीला   आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.