Pune News : आज कोविशिल्ड मिळणार नाही, सात केंद्रावर दीडशे कोव्हॅक्‍सिन लसींचे नियोजन

एमपीसी न्यूज : शहरात आज (शुक्रवारी) कोविशिल्ड लस मिळणार नाही. तर सात केंद्रांवर कोव्हॅक्‍सिनचेच डोस मिळणार असून, प्रत्येक केंद्रांवर दीडशे लसींचे नियोजन करण्यात आले आहे.  

18 वर्षांवरील सर्व नागरिकांना आज (शुक्रवारी) कोव्हॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. याशिवाय 29 जुलैला कोव्हॅक्‍सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना आज (शुक्रवारी) 35 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 35 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.

कोव्हॅक्‍सिनचे डोस मिळण्याची सात केंद्रे : 

  1.  येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
  2.  कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
  3.  कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
  4.  गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
  5.  महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
  6.  मंगळवार पेठ – कमला नेहरू रुग्णालय
  7.  ससून सर्वोपचार रुग्णालय

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.