Cowin App News : कोविन ॲपचा फज्जा ; डिजीटल इंडियाचा बोजवारा

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या डिजीटायजेशनसाठी तयार केलेल्या ‘द कोव्हिड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क – कोविन’ ॲपचा शुभारंभाच्या दिवशी(शनिवार 16 जानेवारी) फज्जा उडाला. सोमवारपर्यंत त्या ॲपद्वारे नोंदणीचे काम सुरू न झाल्यामुळे डिजीटल इंडियाचा देखील बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांसह फ्रंट लाईन वर्कर्सना कोव्हिशिल्ड लसीकरण सुलभ करण्यासाठी ऑनलाईन फ्लॅटफॉर्म कोविन ॲप तयार केले आहे. लस देणारे आणि लाभार्थींच्या सुलभीकरणासाठी हे ॲप वापरणे अपेक्षित होते. रजिस्ट्रेशन, ड्राईव्ह आणि ट्रॅकिंगसाठी हे ॲप तयार केेले आहे. त्यातून क्यूआर कोड सर्टिफिकेट तयार होते जे लाभार्थी त्यांना दिले जाणार आहे ते सर्टिफिकेट तयारच होत नसल्यामुळे ऑफलाईन काम सुरू आहे.

परंतु शुभांरभाच्या पहिल्या दिवशी ॲप हँग झाल्यामुळे नोंदणीची ऑफलाईन कामे करावी लागली. त्यानंतर त्या ॲपच्या दुरूस्तीचे काम तर झाले नाहीच उलट राज्य व केंद्राकडून ॲपचा वापर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

या संदर्भात पुणे महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ.आशिष भारती म्हणाले, कोविन ॲपमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऑफलाईन नोंदणी व अन्य काम करावे लागले. त्यानंतर आज तीन दिवस झाले तरी ॲप हँगच आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रशासकीय कामांत अडथळे येत आहेत. एकीकडे डिजीटल इंडिया म्हणतो तर दुसरीकडे देशव्यापी लसीकरण मोहीमेसाठीचे ॲप बंद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.