Pimpri : लाॅकडाऊन मध्ये अवैधपणे दारू विकणाऱ्यांवर कारवाई करा – सुरेश निकाळजे

pimpri ch
कारवाई साठी करण्यात आलेल्या ई-मेल मध्ये निकाळजे म्हणतात, संपुर्ण देशात पूर्णतः लाकडाऊन करण्यात आले असुन राज्यातील सर्व देशी विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.मात्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या परिस्थितीचा फायदा घेवून चोरून लपून अनेक ठिकाणी बेकाकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री चे प्रकार समोर येत आहेत.
कोरोना संसर्ग परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया च्या हद्दीत पिंपरी कॅम्प, भाटनगर,काळेवाडी, थेरगाव, तळेगाव, वाकड,भोसरी, चिखली, निगडी, चिंचवड या भागात बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे याची गंभीर दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने घ्यावी.तसेच अशी विक्री करणार्या वर दारूबंदी कायद्यासह एमपीडीए कायद्याखाली कठोर कारवाई करावी अशी मागणी सुरेश निकाळजे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.