Pimpri : महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथक तयार करा

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात यावी. रात्री बे रात्री नोकरीवरून व खासगी काम करणाऱ्या महिलांना घरी येताना धोका होणार नाही अशी यंत्रणा तात्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे.

हैद्राबाद येथे घडलेल्या घृणास्पद घटनेचा निषेध केला. तसेच पीडित मृत्युमुखी झालेल्या डॉ. प्रियांका रेड्डी यांच्या बलात्काऱ्यांना फाशीची ‍शिक्षा तात्काळ देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायालयामार्फत करण्यात येऊन संबंधितावर कठोर ‍शिक्षेची तत्काळ अमंलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

देशातील मुलींची,‍ महिलांची संख्या पाहता त्या सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाकडून सुरक्षाबाबत कठोर कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात अशी घटना होणार नाही. वारंवार फक्त अश्वासन देऊन काहीही होणार नाही. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात यावी. रात्री बे रात्री नोकरीवरून व खासगी काम करणाऱ्या महिलांना घरी येताना धोका होणार नाही, अशी यंत्रणा तात्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा कविता खराडे, ॲड. सोनाली घाडगे, युवती उपाध्यक्ष नेहा पडवळ, युवती उपाध्यक्ष चैत्राली आढाव, युवती सरचिटणीस हिना आत्तार, राधा ननावरे, रेखा सुर्यवंशी यांच्यासह युवती पदाधिकारी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.