Pune : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी तीन महिन्यांचा आराखडा तयार करा : विरोधी पक्षांची मागणी

Create a three-month plan to prevent the Corona crisis: Opposition demands : राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या गटनेत्यांनी केली मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करा, अशी मागणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या गटनेत्यांनी केली आहे.

या संदर्भात या गटनेत्यांनी आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी, मशिनरी, बेड्स, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर, आयसीयु बेड्स, डाॅक्टर्स, लॅब टेक्निशन, फिजिशन, आवश्यक असणारे मनुष्यबळ व औषधे उपलब्ध करून द्यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करून त्वरीत कार्यवाही करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जे जे शक्य आहे ते करण्यासाठी पावले उचलावीत, यासाठी लागणारे सहकार्य आम्ही देऊ, असेही या गटनेत्यांनी आयुक्तांना सांगितले.

खाजगी दवाखान्यात मनपाचा समन्वयक असावा. त्यामुळे बेड संख्या समजू शकेल, अशा अनेक उपाययोजना विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना सुचविल्या.

जास्तीत जास्त कोवीड सेंटर उपलब्ध करणे गरजेचे आहे. या सेंटरमध्ये अनेक अडचणी आहेत, त्याकडेही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. प्रशासनातील जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदारी देणे गरजेचे आहे. टेस्ट तपासणी केंद्राची संख्या वाढविण्यात यावी, अशा अनेक मागण्या या गटनेत्यांनी केल्या.

दरम्यान, आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी विरोधी पक्षाच्या सूचनांचा व उपाययोजनाचा विचार करून त्वरीत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.