Chinchwad : नागरिकांमध्ये आणि सैनिकामध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे

एमपीसी न्यूज –  सैनिक हे देशाचे रक्षण करतात. सैनिक आणि नागरिकांमध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महावीर चक्र विजेते नायक दिगेंद्र कुमार यांनी चिंचवड येथे केले. ते पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन व जैन विद्या प्रसारक मंडळ यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या कारगिल दिनानिमित्त बोलत होते.

यावेळी डॉ. शरद जोशी, राज्यमंत्री लेखा समिती अॅड. सचिन पटवर्धन, अॅड राजेंद्र मुथ्या, अनिलकुमार कांकरिया, पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, गोपाळ बिरारी, हरीष मोरे, अतुल राऊत, प्रताप भोसले, किरण गांधी, सुभाष मालुसरे, निलेश मरळ, युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, तेजस खेडेकर, सतिश भारती, धनंजय कुलकर्णी, अक्षय पवार आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना नायक दिगेंद्र कुमार म्हणाले की, आजची तरुण पिढीमध्ये देशाविषयी देशभक्ती जागृत करण्याची गरज आहे. तरुणांनी जर ठरवले तर देशात आणखी बद्दल घडतील. यावेळी त्यांनी कारगिल युद्धाचा थरार मांडला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कारगिल युद्धामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल नायक दिगेंद्र कुमार यांना “शौर्य पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले.

अॅड. सचिन पटवर्धन, अॅड. राजेंद्र मुथा, डाॅ. शरद जोशी, गजानन चिंचवडे यांनीही आपले मत यावेळी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी सरोटे यांनी तर आभार मनीषा जैन यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.