Pune : तीनही गटातून मातोश्री शाळेची आगेकूच 

"सृजन कप' 2019 सिक्‍स अ साईड स्लम फुटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला संघाने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करताना आजपासून सुरू झालेल्या “सृजन कप’ 2019 सिक्‍स अ साईड स्लम फुटबॉल स्पर्धेत तीनही गटातून आगेकूच केली. ही स्पर्धा टायगर प्ले टर्फ क्रिएटीसिटी मॉल येथे सुरू झाली. उद्घाटनाच्या दिवशी कोरेगाव येथील मातोश्री प्रशाला संघाने 12, 14 आणि 16 वर्षांखालील अशा तिनही गटातून विजय मिळविले.
मातोश्री प्रशाला संघाने 12 वर्षांच्या खालील गटात आयडियल इंग्लिश माध्यम प्रशाला संघाविरुद्ध गोलशून्य बरोबरी राखली. त्यानंतर रेहान अश्रफने पाचव्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलवर त्यांची आयडियल प्रशाला संघाचाच 1-0 असा पराभव केला. त्यानंतर 14 वर्षांखालील गटात त्यांना आयडियल प्रशाला संघाकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. पण, नंतर त्यांनी मायटी स्ट्रॉम संघावर 2-0 असा विजय मिळविला. नोहा ठाकूर आणि विष्णू पवार यांनी हे गोल केले. गटात मातोश्री प्रशाला संघ 1 विजय एक पराभव अशा कामगिरीने पुढील फेरीसाठी पात्र ठरला.

मातोश्री प्रशाला संगाने 16 वर्षांखालील गटात सलग तीन विजय मिळविले. प्रथम त्यांनी आयडियल प्रशाला संघाचा 1-0 असा पराभव केला. एकमात्र गोल सातव्या मिनिटाला रुपेश म्हस्के याने केला. दुसऱ्या सामन्यात रुपेशच्याच (2, 11 आणि 13वे मिनिट) गोल हॅटट्रिकने त्यांनी पूज्य कस्तुरबा गांधी प्रशाला संघाचा 3-0 असा पराभव केला. तिसऱ्या विजयाला गवसणी घालताना त्यांनी मायटी स्ट्रॉम संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यातही रुपेशची कामगिरी निर्णायक ठरली. त्याने 5 आणि 10व्या मिनिटाला असे दोन गोल केले. त्यांचा तिसरा गोल गौतम चव्हाण याने 14 व्या मिनिटाला केला.

स्पर्धेतील प्रत्येक सामना 14 मिनिटांचा खेळविण्यात आला. यात सात मिनिटांचे दोन सत्र होते.
त्यापूर्वी स्पर्धेचे उद्‌घाटन पुण्यातील व्यावसायिक फुटबॉलपटू परेश शिवलकर याच्या हस्ते उद्‌गघाटन करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे सदस्य विक्रांत इंदुलकर उपस्थित होते. स्पर्धा आता पिंपरी-चिंचवडमधील संघांसाठी हाईल.

निकाल

12 वर्षांखालील : अ : आयडीयल इंग्लिश माध्यम प्रशाला 0 अनिर्णित वि. मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला 0, मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला 1 (रेहान अश्रफ) वि.वि. आयडियल इंग्लिश माध्यम प्रशाला 0

14 वर्षांखालील : अ : आयडियल इंग्लिश माध्यम प्रशाला 1 (समीर शेख) वि.वि. मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला 0, मायटी स्ट्रॉम 1 (उमेश लोहार) वि.वि. आयडियल इंग्लिश माध्यम प्रशाला 0, मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला 2 (नोहा लोहार, विष्णू पवार) वि.वि. मायटी स्ट्रॉम 016 वर्षांखालील : अ : मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला 1 (रुपेश म्हस्के) वि.वि. आयडियल इंग्लिश माध्यम प्रशाला 0, पूज्य कस्तुरबा गांधी प्रशाला 1 (साहिल शेख) वि.वि. मायटी स्ट्रॉम 0, मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला 3 (रुपेश म्हस्के 3) वि.वि. पूज्य कस्तुरबा गांधी प्रशाला 0, आयडियल इंग्लिश माध्यम स्कूल 2 (फेझन तांबोळी 2) वि.वि. मायटी स्ट्रॉम 1 (गिरीश धोकडे), मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला 3 (रुपेश म्हस्के 2, गौतम चव्हाण) वि.वि. मायटी स्ट्रॉम 0, आयडियल इंग्लिश माध्यम स्कूल 0 अनिर्णित वि. पूज्य कस्तूरबा गांधी प्रशाला 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.