Pune News : स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मिळण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती

एमपीसी न्यूज -पुस्तकांसाठी पुण्यातील अप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे़.  खासकरून स्पर्धा परीक्षांची पुस्तके घेण्यासाठी याठिकाणी पुस्तके घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके  उपलब्ध करून देण्यासाठी खास संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या संके तस्थळामुळे आवश्यक पुस्तके  एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. 

लाॅकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार आपापल्या गावी गेले असून गावी राहून अभ्यास करण्यासाठी आवश्यक पुस्तके  उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील उमेदवारांची गरज लक्षात घेऊन महेश बडे आणि किरण निंभोरे या तरुणांनी पुढाकार घेऊन  https://www.abcbook.in/ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षांची पुस्तके  उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या संकेतस्थळाद्वारे राज्यात कुठेही पुस्तके  सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतील. जेणेकरून उमेदवारांना खर्च करून केवळ पुस्तकांसाठी पुण्यात यावे लागणार नाही. सुरुवातीला पुस्तके  पोहोचवण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.