सोमवार, डिसेंबर 5, 2022

Creative Combines Art Fest : बालगंधर्व येथे 26 जूनपासून क्रिएटिव्ह कॉम्बाईन्स आर्ट फेस्टला प्रारंभ

एमपीसी न्यूज : क्रिएटिव्ह कंबाईन्स (Creative Combines Art Fest) महेश निरंतरे आणि अब्दुलकादिर दिवाण तर्फे बालगंधर्व, पुणे येथे रविवार 26 जून ते मंगळवार 28 जून या कालावधीत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आर्ट फेस्टमध्ये 35 नामवंत कलाकारांच्या खास कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ज्यात अनेक व्यावसायिक ज्येष्ठ कलाकार आणि व्यावसायिक महिला कलाकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध, प्रतिष्ठित कलाकार मनोज साकळे यांचे आकर्षक ‘लाइव्ह पेंटिंग डेमो सेशन’ असेल. सोमवार 27 जून रोजी दुपारी 4 वाजल्यापासून महाविद्यालयीन तरुण, ज्येष्ठ कलाकार आणि सर्व पुणेकरांना कलेविषयी प्रेम आणि आत्मीयता असलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Pimpri News : UPSC, MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांच्या हस्ते सत्कार

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. क्रिएटिव्ह कॉम्बाइन्सचे (Creative Combines Art Fest) अब्दुलकादिर दिवाण म्हणाले, “हा शो आयोजित करण्यामागचा हेतू तरुण नवोदित कलाकार, छंद कलाकार आणि सर्व कलाप्रेमींना प्रोत्साहन देणे हा आहे. जो प्रत्येकाच्या जीवनात कला आणण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे.”

Latest news
Related news