Credit card fraud : रिवॉर्ड पॉइंटचे आमिष दाखवत तरुणाला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट मिळाले असल्याचे सांगत क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत एक लाख 98 हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली.(Credit card fraud) ही घटना 17 ऑगस्ट रोजी रात्री घडली.

दिग्विजय हिरालाल गढरी (वय 28, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burglary crime : घराचे कुलूप तोडून एक लाख रुपयांचे दागिने चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय यांना 17 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता मेसेज आला. त्यांच्या क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंट सहा हजार 850 रुपये उद्या संपणार आहे.(Credit card fraud) हे रिवॉर्ड पॉईंट मिळविण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती भरा, असे मेसेजमध्ये म्हटले होते. त्यामुळे दिग्विजय यांनी लिंकवर क्लिक करून क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही, एक्स्पायरी डेट अशी माहिती भरली. त्या माहितीच्या आधारे दोन टप्प्यात दिग्विजय यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख 98 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.