Cricket Corona Update : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या मशरफे मुर्तझा याला कोरोनाची लागण

Cricket Corona Update: After Afridi, Bangladesh's Mashrafe Mortaza infected with coronavirus

एमपीसी न्यूज – नामवंत पाकिस्तानी क्रिकेटपटू अफ्रिदीनंतर बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफे मुर्तझा याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

ANI या वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार मोर्तझाने आपली कोरोना चाचणी केली होती. तिचा आज (शनिवारी) अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले आहे.  मोर्तझा बांगलादेश एकदिवसीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार होता. त्याने यावर्षी मार्चमध्ये आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता.

मोर्तझाला कोरोनाची लागण कशी झाली याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. बांगलादेश मध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांच्या पार गेली असून बांगलादेश सरकार देशात लॉकडाउन लागू कारण्यासंदर्भात विचार करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like