23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Cricket In Olympics : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वाढली, ICC चे प्रयत्न सुरु

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी अनेकवेळा होत आली आहे. आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वाढली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने  (ICC) यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे ICC ने सांगितले आहे.

ICC च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी एक कार्यरत गट स्थापन करण्यात आला आहे. ऑलिम्पिक 2028, 2032 आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल.’

ICC ने म्हटले आहे की, ‘सुमारे 30 दशलक्ष क्रिकेट चाहते अमेरिकेत राहतात. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर ते खूप फायदेशीर ठरेल.’

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची मागणी अनेकवेळा झाली आहे. याबाबत आता ICC ने प्रयत्न सुरू केले असून क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास 128 वर्षानंतर क्रिकेटचा थरार ऑलिम्पिकमध्ये अनुभवता येणार आहे.

spot_img
Latest news
Related news