Cricket: ‘हा’ भारतीय गोलंदाज म्हणाला, ‘मी’ नाही, लसिथ मलिंगा आहे खरा ‘यॉर्कर किंग’

Cricket: jasprit bumrah said, 'I am not, Lasith Malinga is the real' Yorker King

एमपीसी न्यूज- भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला एक वेगवान गोलंदाज तसेच उत्तम यॉर्कर टाकणाऱ्या गोलंदाजांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. मात्र, या 26 वर्षीय खेळाडूने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला ‘यॉर्कर’ टाकणारा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून मान दिला आहे.

बुमराने IPL फ्रेंचायजी मुंबई इंडियन्सच्या ट्विटरच्या माध्यमातून बोलताना म्हणाला की, लसिथ मलिंगा या सर्वांत अनुभवी व वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ‘या’ चेंडूवर आपले प्रभुत्व निर्माण करत आपल्या संघाला फायदा मिळवून दिला. जगातील सर्वोत्तम ‘यॉर्कर’ टाकणारा तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.

कोरोना महामारीच्या ब्रेकनंतर तो ट्रेनिंगसाठी पुनरागमन करेल तेव्हा त्याच्या शरीरावर किती परिणाम होईल? याविषयी बोलताना बुमरा म्हणाला, मी गेल्या सहा दिवसांपासून व्यायाम करत आहे, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून गोलंदाजी केली नाही.

‘ब्रेक’नंतर जेव्हा मी गोलंदाजी करीन तेव्हा शरीरावरती किती परिणाम होईल हे सांगू शकेन.

श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमरा हे IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. बुमरा IPL मध्ये खेळत असताना लसिथ मलिंगाकडून गोलंदाजी विषयी सातत्याने मार्गदर्शन घ्यायचा.

त्यामुळे त्याच्या गोलंदाजीत खूपच सुधारणा झाली असल्याचे यापूर्वीच बुमराने सांगितले आहे. विशेष म्हणजे दोघांचीही गोलंदाजी करण्याची शैली ही वेगळी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.