_MPC_DIR_MPU_III

Cricket: डावखुरा की उजवा, ओळखा पाहू नक्की कोण बरं आहे हा क्रिकेटियर?

Cricket: Left-handed or Right-handed, let's see who exactly is this cricketer?

एमपीसी न्यूज – सध्या डाव्या हाताने बॅटिंग करणा-या एका जुन्या जमान्यातील क्रिकेटियरचा फोटो व्हायरल होत आहे. तो क्रिकेटियर कोण बरं असावा असा प्रश्न साहजिकच क्रिकेटप्रेमींना पडला. अनेकांनी त्यावर तर्कवितर्क लढवले. काहींना त्याचा स्टान्स ओळखीचा वाटला, तर काहींना त्याची ठेवण ओळखीची वाटली. अखेरीस त्याचे रहस्य उलगडले आणि क्रिकेटप्रेमींना धक्काच बसला.

_MPC_DIR_MPU_IV

कारण या फोटोत डाव्या हाताने बॅटिंग करणारा तो बॅटस्मन मूळचा उजव्या हाताने खेळणारा जगप्रसिद्ध खेळाडू आहे. पण काही कारणामुळे त्या सामन्यात त्याने जाणूनबुजून चक्क डाव्या हाताने बॅटिंग करुन विरुद्ध टीमला पेचात टाकले होते. तो खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर ‘लिटिलमास्टर’ ही उपाधी मिळालेले सुनील गावस्कर आहेत.

ती कर्नाटक विरुद्ध मुंबई अशी  रणजी मॅच होती. सुनील गावस्कर मुंबईकडून रणजीत खेळायचे. मुंबईच्या टीममध्ये भारतीय संघात असलेले अनेक रथी महारथी असायचे. त्यामुळे मुंबईला हरवणे कधीच सोपे नसे. त्याआधी बरीच वर्षे मुंबईने रणजी ट्रॉफी जिकलेली होती. चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबई हरण्याच्या स्थितीत होती. कारण त्यावेळी कर्नाटककडून खेळणा-या रघुराम भट या डावखु-या स्पिनरने मुंबईची दाणादाण उडवली होती.

_MPC_DIR_MPU_II

मुंबई पहिल्या इनिंगमध्ये मागे पडली होती. त्यात कर्नाटकाने चांगली बॅटिंग करुन मोठे लीड घेतले होते. मुंबईच्या दुस-या इनिंगमध्ये स्वस्तात चार विकेट गेल्या होत्या. अशावेळी इनिंगचा पराभव टाळणे आणि इज्जत राखणे हा मुंबईसमोर पर्याय होता. सुनील गावस्कर त्यावेळी चक्क सातव्या नंबरवर बॅटिंगसाठी आले. ते क्रीजवर आले आणि त्यांनी चक्क डावा गार्ड घेतला. याआधी गावस्कर आणि डाव्या हाताने बॅटिंग करणार असे स्वप्नदेखील कोणाला पडले नसेल. पण ते प्रत्यक्षात आले होते.

आणि हाच चक्क टर्निंग पॉइंट ठरला. कारण त्यामुळे रघुराम भट यांची लय बिघडली. त्यांनी गावस्करांना डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा विचार देखील केला नव्हता. आणि त्यामुळे त्यांनी आधी केलेल्या टाइट बॉलिंगची लय बिघडली. मुंबईने ती मॅच डावाचा पराभव होण्यापासून वाचवली. त्यामागे गावस्कर यांची ती डावखुरी बॅटिंग खूप महत्वाची ठरली. त्या सामन्यात गावस्कर यांनी अठरा बहुमोल रन्स केल्या. त्यानंतर ते कधीही डाव्या हाताने खेळले नाहीत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.