Cricket News : भारताला 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत विजेतपद

एमपीसी न्यूज – 19 वर्षाखालील  महिला टी 20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतपद मिळविले (Cricket News) आहे. हा सामना इंग्लंड मुलींच्या संघासोबत होता.

हा सामना दक्षिणआफ्रिकेतील सेनवेस पार्क येथे पार पडला. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांस सहाय्य करणारी असल्याने, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला 68 धावांवर सर्वबाद केले.कर्णधार शेफाली वर्माने हिने दमदार खेळी खेळत 7 गडी राखून दणदणीत विजय संघाला मिळवून दिला.

Today’s Horoscope 30 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या तर तीतस साधू हीला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारतीय मुलींनी आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला असल्याने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयोत्सव करण्यासाठी निमंत्रण (Cricket News) दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.