Cricket : IPL आमच्या देशात खेळवा! ‘श्रीलंका’ नंतर ‘UAE’ देशाची BCCI ला ऑफर

Cricket: Play IPL in our country! After 'Sri Lanka', 'UAE' offers to BCCI

एमपीसी न्यूज –  काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने  बीसीसीआयला IPL त्यांच्या देशात खेळवण्यासाठी ऑफर दिली होती. BCCI ने या ऑफरमध्ये फारसा रस दाखवला नाही. आता श्रीलंकेनंतर ‘UAE’  देशाने IPLचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.

UAE ने BCCI ला IPL स्पर्धा त्यांच्या देशात घेण्याची ऑफर दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडत चाललेली IPL स्पर्धा यावर्षी परदेशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र BCCI ने या देशाच्या ऑफरवर कोणताही विचार केला नाही.

IPL चा 13 वा हंगाम नियोजित वेळेनुसार IPL 29 मार्चपासून सुरू होणार होता आणि 24 मे रोजी फायनल सामना होणार होता. पण कोरोनाच्या संकटामुळे BCCI ने ही स्पर्धा प्रथम 14 एप्रिलपर्यंत स्थगित केली, त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे IPL अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी IPLचे आयोजन करण्याची तयारी  श्रीलंकेने दाखवली होती. लंकने BCCI ला तशी ऑफर दिली होती.  या ऑफरमध्ये BCCI ने फारसा रस दाखवला नाही. आता लंकेनंतर ‘UAE’ या देशाने IPLचे आयोजन त्यांच्या देशात करण्याची तयारी दाखवली आहे.

BCCI ने ‘श्रीलंका’ किंवा ‘UAE’ या दोन्ही देशांच्या ऑफरवर कोणताही विचार केला नाही. कारण कोणत्याही मोठ्या देशात अद्याप क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे BCCI कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले. दरम्यान काही खेळाडू प्रक्षकाविना IPL सामने खेळवण्यास आग्रही आहेत. मात्र BCCI कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.