Cricket Resumes Again: पुन्हा थरार क्रिकेटचा ! इंग्लंड आणि वेस्ट इंडीज कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात

Cricket Resumes Again: England and West Indies Test series starting today खेळाडूंना मैदानासह ते राहत असलेल्या हॉटेलवरही नियम पाळावे लागणार आहेत.

एमपीसी न्यूज- तब्बल 117 दिवसांच्या सक्तीच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये पहिला कसोटी सामना साऊदम्पटन येथे खेळवला जाणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ स्थगित झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बुधवारपासून (दि.8) सुरूवात होत आहे.

साऊदम्पटनच्या एजेस बाऊद या जैवसुरक्षित स्टेडियमवर इंग्लंड संघ पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे. मात्र, खेळाडूंना मैदानासह ते राहत असलेल्या हॉटेलवरही नियम पाळावे लागणार आहेत.


काय आहेत नवीन नियम ?

– रिझर्व्ह खेळाडू बॉल बॉय म्हणून काम करतील.
– स्टम्प्स आणि बेल्स साफ करण्यासाठी ब्रेक घेतला जाईल.
– गोलंदाजांना चेंडूला लाळेचा वापर करता येणार नाही.
– सामन्याचे वार्तांकन आणि चित्रीकरण करणाऱ्या पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांना पीपीई किट घालणे बंधनकारक

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून स्टेडियममध्ये खेळाडूंना चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत. मात्र, वातावरण निर्मितीसाठी विशेष प्रयोग केले जाणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.