Cricket : सुरेश रैना म्हणतो, सचिनमुळेच आम्ही वर्ल्डकप जिंकला

Cricket: Suresh Raina says, we won the World Cup because of Sachin

एमपीसी न्यूज – सचिन तेंडुलकर यांनी बजावलेल्या मेंटाॅरशीप मुळेच आम्ही 2011 सालचा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला असे मत क्रिकेटपटू सुरेश रैना याने व्यक्त केले आहे.

सुरेश रैना याने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बद्दल मत व्यक्त करताना म्हणाला, 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धा सांघिक कामगिरीवर गाजली. मात्र, असे असले तरीही त्यात सचिनने वठवलेला मेंटॉरचा रोल ही स्पर्धा जिंकण्यात सर्वात जास्त महत्त्वाचा ठरला होता. स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकायलाच हवा असे कोहलीचे मत असायचे, तर सचिन मात्र, त्यावेळी आपल्या योजना अपयशी ठरल्या तरी ‘प्लॅन बी’ तयार ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना द्यायचा.

सचिन तेंडुलकर संघातील एकाही खेळाडूवर अतिरिक्त दडपण तो येऊ नये यासाठी प्रयत्न करत होता. कर्णधार नसला तरी नेतृत्व तोच करताना दिसायचा असे रैना म्हणाला. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू, जगातील सर्वात श्रेष्ठ फलंदाज असतानाही सचिन नव्या खेळाडूच्या मतालाही महत्त्व देत होता हे विशेष.

सामना कोणत्याही संघाशी असो सचिन कायम त्या संघातील खेळाडूंच्या कमकुवत दुव्यांचा विचार करायचा व त्यानुसार सर्व खेळाडू योजना तयार करायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना मला सचिन आणि कोहलीसह एकाच संघात खेळायला मिळाले यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो, असेही रैनाने म्हटले आहे.

2011 सालचा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने, हा विश्वचषक आम्हाला सचिन तेंडुलकर साठी जिंकायचाच होता, अशी भावना व्यक्त केली होती. सचिन तेंडुलकरला सुद्धा भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचे स्वप्न होते ते स्वप्न 2011 मध्ये जाऊन पूर्ण झाले होते. सुरेश रैनाने व्यक्त केलेल्या मता मुळे निश्चितच पुन्हा एकदा सचिनबद्दल अभिमान वाढणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.