Cricket Update: खळबळजनक ! सुपरओव्हरपूर्वी बेन स्टोक्‍सने धूम्रपान केलं होतं

Cricket Update: Ben Stokes smoked before the super over in 2019 world cup स्टोक्स या मैदानावर अनेकदा खेळलेला असल्याने त्याला येथील सर्व जागांची माहिती आहे. त्यामुळे सिगारेट ओढण्यासाठी त्याने अशीच जागा निवडली होती.

एमपीसी न्यूज- 2019 विश्वचषक अंतिम सामन्याच्या सुपरओव्हर पूर्वी ड्रेसिंगरूममध्ये परतल्यावर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्‍स याने चक्‍क धूम्रपान केल्याचा उल्लेख एका पुस्तकात करण्यात आला आहे. क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस मैदानावर घडलेल्या या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असून आयसीसीच्या कार्यक्षमतेवरच शंका घेण्यात येत आहे.

मॉर्गन्स मेन; द इनसाइड स्टोरी ऑफ इंग्लंड्‌स राइज फ्रॉम क्रिकेट वर्ल्ड कप ह्युमिलेशन टू ग्लोरी या निक होल्ट आणि स्टिव्ह जेम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकात विश्ववकरंडक स्पर्धेतील सुपरओव्हर पूर्वी ड्रेसिंगरूममध्ये परतल्यावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने चक्क धूम्रपान केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मैदानावर जवळपास 30 कॅमेरे असतात तसेच अधिकारी व कर्मचारीवर्ग असतो.

मात्र, स्टोक्स या मैदानावर अनेकदा खेळलेला असल्याने त्याला येथील सर्व जागांची माहिती आहे. त्यामुळे सिगारेट ओढण्यासाठी त्याने अशीच जागा निवडली होती.

_MPC_DIR_MPU_II

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने स्टोक्सच्या खेळीने बरोबरी करण्यात यश मिळवले. त्यावेळी निकाल हाती येण्यासाठी सुपरओव्हर खेळविण्यात आली.

त्यातही दोन्ही संघांनी 15 धावा केल्याने ही ओवरही बरोबरीत सुटली व आयसीसीच्या अनाकलनीय नियमांमुळे इंग्लंडने विजेतेपद मिळवले. दोन्ही संघात सर्वाधिक षटकार ज्या संघाने पटकावले त्याला विजेता घोषित करण्याचा हा निर्णय त्यावेळी तसेच अद्यापही वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.

पुस्तकात केलेल्या उल्लेखावर खुद्द बेन स्टोक्सने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, यावर तो काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1