Cricket Update : द्रविडची संपूर्ण कारकीर्द सचिन तेंडुलकरमुळे झाकोळली – गौतम गंभीर

Dravid's entire career was overshadowed by Sachin Tendulkar - Gautam Gambhir

एमपीसी न्यूज – ‘भारतीय क्रिकेटवर राहुल द्रविडचा प्रभाव तेंडुलकर व गांगुलीपेक्षा अधिक आहे. सौरवने नेहमी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर वन-डे क्रिकेटमध्ये छाप सोडली, पण भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडचा प्रभाव अन्य खेळाडूंच्या तुलनेत अधिक आहे. खरे सांगायचे झाल्यास तुम्ही सचिन तेंडुलकरसारख्या कुणा खेळाडूसोबत त्याच्या प्रभावाची तुलना करू शकता. द्रविडची संपूर्ण कारकीर्द सचिन तेंडुलकरमुळे झाकोळली गेली, पण प्रभाव कदाचित तेवढाच राहिला, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

स्टार स्पोर्टसच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’मध्ये बोलताना गंभीर म्हणाला, ‘राहुल द्रविडला आपण त्याच्या नेतृत्वाचे श्रेय देत नाही, हे दुर्दैव आहे. आपण केवळ सौरव गांगुली, एम.एस. धोनीबाबत चर्चा करतो. आता आपण विराट कोहलीबाबत बोलतो, पण राहुल द्रविड भारतासाठी एक शानदार कर्णधार होता, असे गौतम गंभीर म्हणाला.

द्रविडने भारतातर्फे 79 वन-डे सामन्यांत नेतृत्व केले असून त्यापैकी 42 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामध्ये सलग 14 सामने जिंकण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे.

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमाणेच ‘द्रविडचे योगदान देखील मोठे आहे, पण त्याला पुरेसे श्रेय मिळाले नसल्याची खंत गंभीरने व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.