Cricket Update : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द

Indian team's tour of Sri Lanka canceled

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा श्रीलंका दौरा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाच्या क्रिकेट बोर्डने ही परिस्थिती सामने भरवण्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले आहे.

भारतीय संघ या महिन्यात मर्यादित षटकांचे सामने खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव पाहता ही परिस्थिती सामने खेळण्यासाठी योग्य नसल्याचे दोन्ही संघाच्या बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय संघ श्रीलंकेबरोबर तीन एक दिवसीय व तीन टी-20 सामने खेळणार होता मात्र, करुणा विषाणूंमुळे ते शक्य नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती देताना असे सांगितले कि, सद्य परिस्थिती पाहता कोणत्याही सामन्यांचे आयोजन करणे शक्य होणार नाही.

कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे क्रिकेट सामने सुरू करण्यापूर्वी आम्हाला आरोग्य विभागाकडून योग्य त्या सूचना व अधिकृत परवानगी मिळणे आवश्यक आहे.

श्रीलंकेमध्ये कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला नसला तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेमध्ये आजवर 1873 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 11 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतीय संघाने 2017 मध्ये श्रीलंका दौरा केला होता. त्यामध्ये तीन कसोटी सामने, पाच एक दिवसीय सामने व एका ट्वेंटी-ट्वेंटी सामन्याचा समावेश होता. भारतीय संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये श्रीलंकेला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.