Cricket Update : जोफ्रा आर्चर दुसऱ्या कसोटीला मुकणार; बायो सुरक्षेचा नियम तोडल्यानंतर बोर्डाचा निर्णय

Joffra Archer will miss the second Test; Board decision after breaking biosecurity rules

एमपीसी न्यूज – इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्ववभूमीवर करण्यात आलेल्या बायो प्रोटोकॉलचे आर्चरने उल्लंघन केल्याप्रकरणी इंग्लंड आणि व्हेल्स क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

आर्चर पाच दिवसांचा सेल्फ आसोलेशन कालावधी पूर्ण करेल तसेच त्यानंतर त्याची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात येईल. बंदी हटवण्यापूर्वी त्याच्या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह यायला हव्यात, असे इंग्लंड आणि व्हेल्स क्रिकेट बोर्डाने म्हंटले आहे.

आर्चर याने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. सगळे खेळाडू आणि टीम व्यवस्थापनाला धोक्यात घातल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

याबाबत खुलासा करताना आर्चर म्हणाला, मला खूप दुःख होत आहे. मी जे काही केले आहे ते मला स्वीकार्य आहे. या गोष्टीचे मला दुःख आहे कि मी दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मला वाटते मी दोन्ही टीमला ठेस पोहचवली आहे. त्याबद्दल क्षमस्व.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे.यापूर्वीचा सामना वेस्ट इंडीजने जिंकला असून वेस्ट इंडीज 1-0 ने पुढे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.