Cricket Update: रोहित शर्मा माझा ‘फेव्हरेट’ बॅट्समन- जे. पी. डुमिनी

Cricket Update: Rohit Sharma My 'Favorite' Batsman - J. P. Duminy मागील वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा रोहित शर्मा प्रथम फलंदाजीसाठी उतरत आहे. क्रिकेट मधील त्याच्या कामगिरीकडे जगातील क्रिकेट रसिकांचे कायम लक्ष लागून राहिलेले असते.

एमपीसी न्यूज- साऊथ आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटर जे. पी. डुमिनी म्हणाला रोहित शर्मा हा माझा ‘फेव्हरेट’ बॅट्समन आहे. झिंबाब्वेचा माजी मध्यम गती गोलंदाज पॉमी मबंगवा यांच्याशी इन्स्टाग्राम लाईव्ह चर्चेदरम्यान त्याने आपले मत व्यक्त केले आहे.

डुमिनी म्हणाला की, रोहित शर्मा हा माझा ‘फेव्हरेट’ बॅट्समन आहे. तो ज्या पद्धतीने पूल शॉट मारतो ते मला जास्त आवडते. रोहित शर्माने 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात फक्त 9 सामन्यात 81 च्या सरासरीने 648 धावांचा डोंगर उभा केला होता. तो फारच भेदक फलंदाज असल्याचे जे. पी. डुमिनी म्हणाला.

भारताचा एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माने आत्तापर्यंत 224 एकदिवसीय सामने, 108 T20 तर 32 कसोटी सामने खेळले असून तिन्ही प्रकारात मिळून तब्बल 14,029 धावा कुटल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकांचा विक्रम तसेच इडन गार्डनवर श्रीलंके विरुद्धच्या 50 षटकांच्या मर्यादित सामन्यात केलेल्या 264 धावांचा विक्रम सुद्धा रोहितच्याच नावावर आहे.

मागील वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा रोहित शर्मा प्रथम फलंदाजीसाठी उतरत आहे. क्रिकेट मधील त्याच्या कामगिरीकडे जगातील क्रिकेट रसिकांचे कायम लक्ष लागून राहिलेले असते.

रोहित शर्माच्या फलंदाजीचा करिष्मा आयपीएलमध्ये पाहायला मिळाला असता पण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like