_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Cricket Update: रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या महान गोलंदाजाचे निधन

Cricket Update: The greatest wicket-taker in Ranji cricket has passed away गोयल यांनी रणजीच्या एकाच हंगामात 25 पेक्षा जास्त बळी टिपण्याचा कारनामा 15 वेळा केला. हरयाणाच्या गोयल यांनी 157 सामने खेळले. 55 धावांत 8 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

एमपीसी न्यूज- रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे रविवारी वयाच्या 77 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक 637 बळी घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

रणजी क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणत्याही खेळाडूला 600 बळींचा टप्पा गाठता आलेला नाही. तो पराक्रम गोयल यांनी त्यांच्या कारकिर्दीत करून दाखवत रणजी क्रिकेट गाजवले, पण दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.

_MPC_DIR_MPU_II

गोयल यांनी रणजीच्या एकाच हंगामात 25 पेक्षा जास्त बळी टिपण्याचा कारनामा 15 वेळा केला. हरयाणाच्या गोयल यांनी 157 सामने खेळले. 55 धावांत 8 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

त्यांनी 59 वेळा एका डावात 5 बळी तर 18 वेळा एका सामन्यात 10 बळी टिपण्याची किमया साधली. त्यांनी आपल्या रणजी कारकिर्दीत 1037 धावाही केल्या. ते पतियाळा, पंजाब आणि दिल्ली या संघांकडून क्रिकेट खेळले आहेत.

बीसीसीआयसह काही माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रवी शास्त्री यांनी त्यांच्या गोलंदाजीची कौतुक करत त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. वीरेंद्र सेहवाग यांनी सुद्धा गोयल यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.