_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Cricket Update: बाप रे ! इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण

Cricket Update: Three Pakistani players were infected with corona before leaving for England सध्या वेस्ट इंडिज संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर, या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तान इंग्लंडच्या दौऱ्यासाठी जाणार होता.

एमपीसी न्यूज- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघामधील तीन खेळाडूना कोरोनाची लागण झाल्याचे बोर्डाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या तिन्ही खेळाडूंची दौऱ्यापूर्व केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अष्टपैलू खेळाडू शाहदाब खान, फलंदाज हैदर आली आणि जलदगती गोलंदाज हॅरिस रौफ या तीन खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत निवेदन काढून माहिती दिली आहे. या तिन्ही खेळाडूंना कोरोना संबंधित कोणतीच लक्षणे नव्हती. मात्र इंग्लंड दौऱ्यापूर्वी केलेल्या चाचणीत त्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पाकिस्तान संघ या महिन्याच्या अखेरीस इंग्लंड दौऱ्यावर जाणार होता. तत्पूर्वी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला होता या चाचणीमध्ये शाहदाब खान, हैदर आली आणि हॅरिस रौफ यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना तात्काळ आयसोलेट करण्यात आले आहे.

सध्या वेस्ट इंडिज संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर, या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तान इंग्लंडच्या दौऱ्यासाठी जाणार होता. मात्र, तीन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगलाच धक्का बसला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी सर्व पाकिस्तान खेळाडूंची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना करण्यात येणार आहे. तसेच या खेळाडूंना इंग्लंडमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे पीसीबीने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.