
Cricket Updates: जुलैमध्ये वेस्टइंडिजचा इंग्लंड दौरा, कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर
Cricket updates: west indies cricket tour of england in july, test series schedule announced

एमपीसी न्यूज- जवळपास तीन महिन्यांच्या सक्तीच्या लॉकडाऊन नंतर क्रीडा विश्वातून क्रिकेट रसिकांसाठी खूशखबर आली आहे. जुलैमध्ये वेस्टइंडिज क्रिकेट टीम इंग्लंड दौरा करणार असून या दोन संघात होणाऱ्या तीन कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

वेस्टइंडिज क्रिकेट टीम 9 जून रोजी इंग्लंमध्ये पोहोचणार आहे. या दोन देशातील तीन कसोटी सामन्यांची मालिकांची सुरूवात 8 जुलैपासून साउथॅप्टन येथून होणार आहे.
वेस्टइंडिज क्रिकेट टीमचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार जेसन होल्डर करणार आहे.
* असा असेल दौऱ्याचा कार्यक्रम
पहिला सामना : 8 जुलै ते 12, एजिस बाऊल

दुसरा सामना : 16 जुलै ते 20, ओल्ड ट्रैफड
तिसरा सामना : 24 जुलै ते 28, ओल्ड ट्रैफड
ब्रिटन सरकारने या स्पर्धेला अजून परवानगी न दिल्याची माहिती समोर येत आहे मात्र, खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि इतर संबंधित यंत्रणेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अंतिम निर्णय घेतला जाईल.
याबाबत वारंवार वैद्यकीय सल्ला देखील घेतला जात आहे. दरम्यान हे सामने प्रेक्षकाविना खेळवले जाणार आहेत.
वेस्टइंडिज क्रिकेट टीम 9 जून रोजी इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच, योग्य वैद्यकीय तपासणी नंतरच खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली जाणार आहे.
