Pune : क्रिकेट वर्ल्ड कप मॅचेसवर सट्टा : 11 लाख रुपयांसह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड, हिंगणे येथे बेकायदेशीर मोबाईलवरून सट्टा लावणा-या चौघांना अटक करण्यात आली. बुधवारी (दि.5) सायंकाळी 5 वाजता ही कारवाई करण्यात आली.

सचिन चव्हाण (वय 38), अमोद खळदकर (वय 50, नाना पेठ), राहुल जगताप (वय 38, कोंढवा), पृथ्वीराज येळवंडे (वय 38 बुधवार पेठ), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोबाईल फोन, लॅपटॉपद्वारे इंग्लंड विरुद्ध न्यूझिलंड या संघादरम्यान होणा-या सामन्यावर सट्टा लावला. तसेच या कामासाठी बनावट कागदपत्राच्या आधारे सिम घेतल्याचे आढळले आहे. पोलिसांनी कारवाई करीत चौघा आरोपींकडून 11 लाख 83 हजार 940 रुपयांचा माल जप्त करून अटक केली आहे. सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.