Pune : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता

एमपीसी न्यूज : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू (Pune) केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलीसांनी ते हरवल्याची तक्रार दाखल झाली आहे. जाधव कुटुंबियांनी ही तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. पुण्यातील कोथरूड भागातून आज (सोमवार) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ते घराबाहेर पडले ते अद्याप परतलेले नाहीत.

Pune : उद्धवजी आणि देवेंद्रजीना एकत्र आणण्याची फारच घाई झाली आहे – चंद्रकांत पाटील

मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचे कुटुंबीय कोथरूड भागात राहतात. महादेव जाधव हे सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सिटी प्राईड कोथरूड येथून रिक्षेतून बसून गेले मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोनही बंद लागत आहे.(Pune) त्यांचा काहीच संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.