Pune News : क्रिकेटपटू महंम्मद अझरुद्दीन यांनी दिली ‘आझम कॅंपस’ ला भेट

एमपीसी न्यूज : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान असलेल्या महंम्मद अझरुद्दीन यांनी नुकतीच ‘आझम कॅंपस’ ला  भेट दिली. यावेळेस त्यांनी आझम कॅंपसमधील क्रीडाविषयक प्रगतीचे कौतुक केले.

_MPC_DIR_MPU_II

संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एस ए इनामदार, इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे गुलझार शेख यांनी त्यांचे स्वागत केले. अझरुद्दीन यांनी कॅंपसमधील क्रिकेट मैदान आणि पॅव्हेलियनची पाहणी केली.

यावेळेस त्यांनी आझम स्पोर्ट्स अकादमीच्या क्रीडापटू विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळेस अझरुद्दीन यांच्याबरोबर रियाझ बागवान हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1