Ruturaj Gaikwad : पिंपरी-चिंचवडकर ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! एकाच षटकात ठोकले सात षटकार

एमपीसी न्यूज : विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय. ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.  (Ruturaj Gaikwad) भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहनं 15 वर्षांपूर्वी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं केलीय. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाड हा पिंपरी-चिंचवड येथील सांगवी येथे राहणारा आहे.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात आज क्वार्टर फायनल सामना खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशसमोर 50 षटकात 331 धावांचं लक्ष्य ठेवलं. महाराष्ट्राकडून ऋतुराजनं अवघ्या 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी. ज्यात 10 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडचं हे मागील आठ डावातील सहावं शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे 13वं शतक आहे.

Khadki news: शेकोटी पेटवून नका असे सांगितल्याने अल्पवयीन मुलांनी चिडून एका 35 वर्षीय तरुणाचा केला खून

महाराष्ट्राच्या डावातील 49 षटकात डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंह गोलंदाजी करण्यासाठी आला. ऋतुराजनं या षटकातील चार चेंडूत सलग चार षटकार ठोकले.(Ruturaj Gaikwad) त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल ठरला. यावरही ऋतुराजनं उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर अखेरच्या दोन्ही चेंडूवर दोन षटकार मारून ऋतुराजनं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला.

ऋतुराज गायकवाडनं 109 चेंडूत शतक पूर्ण केलं आणि 138 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला. म्हणजेच त्याच्या पुढच्या 50 धावा फक्त 29 चेंडूत आल्या. 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. त्यानं अजी काझीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अझीम 42 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. उत्तर प्रदेशचा कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 66 धावांत 3 विकेट्स घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.