Virat Kohli ‘180 Landings’ Workout: विराटने पहिल्यांदाच केला 180 डिग्री एक्सरसाइज, पाहा VIDEO

Cricketer Virat Kohli Shared Video Of 180 Degree Exercise To Stay Fit During Covid 19 Lockdown

एमपीसी न्यूज- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कोरोना विषाणूमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान स्वतःला फिट ठेवण्यात कोणतीच कसर ठेवताना दिसत नाही. विराटने मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली असून त्यात तो 180 डिग्री लँडिंगचा प्रयत्न करताना दिसत आहे. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या चाहत्यांनी यासाठी त्याचे कौतुकही केले आहे.

जगातील सर्वोत्तम फलंदाजात समावेश असलेला विराट आपल्या फिटनेससाठी खूप सजग आहे. तो तंदूरुस्त राहण्यासाठी जिममध्ये अधिकाधिक वेळ व्यतीत करत असतो. त्याने अशाच एका व्यायामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडिओत विराट कोहली आपला एका पायावर पूर्णपणे 180 अंशात उडी मारल्यानंतर दुसऱ्या पायावर उभा राहताना दिसतो. त्याने व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले की, ‘180 अंशात माझा पहिला शॉट. टॉप एक्सरसाईज’


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा परिणाम क्रिकेट जगतावरही होताना दिसत आहे. सध्या क्रिकेट मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएलसारखी प्रतिष्ठित लीगही स्थगित करण्यात आली आहे.

कोरोनाचा कहर नसला असता तर सध्या विराट आयपीएलमध्ये आपली टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचे नेतृत्व करताना मैदानात दिसला असता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like