Chakan News : उसने पैसे न देणाऱ्या मित्रावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मित्र म्हणल की तो उसने पैसे घेणार पण तो परत करेल याची काही गॅरंटी नाही…मित्रांशी होणाऱ्या व्यवहारावर अनेक जोक तुम्ही एकले असतील(Chakan News) मात्र आज एका मित्राने उसने पैसे दिले नाहित म्हणून मित्रावर चक्क गुन्हा दाखल केला आहे. याप्रकऱणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

परेश ज्ञानेश्वर कडेकर (वय 25 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.13) फिर्याद दिली असून अक्षय गजानन खोपडे (वय 28 रा. चाकण) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

Pimpri News : पुणे-जयपूर-पुणे नियमित रेल्वे सुरू करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शाळेतील मित्र आहेत. फिर्यादी यांनी 12 डिसेंबर 2021 राजी दहा हजार रुपये मित्राला उसने दिले होते. ते पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी मंगळवारी (दि.14) फिर्यादी मित्राच्या घरी गेले. यावेळी मित्राचे केवळ आई-वडील घरी होते.

 

त्यामुळे फिर्यादी यांनी मित्राला फोन केला.(Chakan News) पैशांची विचारणा केली अशता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पैशांचा विषय निघताच त्याने पैसे देत नाही जा असे उद्धट उत्तर देत आज तागायत पैसे दिले नाहीत म्हणून थेट पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.