Talegaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तरुणीने स्वतःला जाळून घेतले. तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला.

विक्रांत पाटील (वय 25, रा. वतननगर, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दीपक प्रकाशचंद ओसवाल (वय 45, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि. 19) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 23 ते 29 जानेवारी या कालावधीत घडला आहे. फिर्यादी ओसवाल यांची 21 वर्षीय मयत मुलगी आरोपी विक्रांत याला भेटायला जात होती. तसेच ती फोनद्वारे आरोपीच्या संपर्कात होती. तिला आरोपी विक्रांत सोबत लग्न करायचे आहे, असे तिने फिर्यादी यांना सांगितले होते.

_MPC_DIR_MPU_II

असे असताना तिने 23 जानेवारी रोजी स्वतःला जाळून घेतले. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा उपचारादरम्यान 29 जानेवारी रोजी मृत्यू झाला. दरम्यान आरोपी विक्रांत याने 24 जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या घरावर विटा फेकून मारत फिर्यादी यांना शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like