Bhosari : महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन महिलेशी ओळख वाढवून तिला धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही घटना ऑक्टोबर 2018 ते 18 सप्टेंबर 2019 या कालावधीत भोसरी एमआयडीसी येथे घडली.

अमित सतीश पवार (वय 22, रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती नसल्याचा फायदा घेत आरोपीने त्यांच्याशी ओळख वाढवली. महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांना धमकावून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केला. फिर्यादी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. याबाबत गुन्हा दाखल झाला करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.