Sangavi Crime News : संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी अक्षय म्हसे विरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज – संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी अक्षय म्हसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संविधानाचा अवमान व सामाजिक संतुलन बिघडविण्याच्या हेतूने इन्स्टाग्राम वरुन लाईव्ह संभाषण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बाळु मोहन शेंडगे (वय 39, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात आज (शुक्रवारी) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय म्हसे (रा. पवार नगर, जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने akky_sarkar या इन्स्टाग्राम अकाउंट वरुन मित्रांसोबत संविधानाचा अवमान करणारे लाईव्ह संभाषण केलं. या संभाषणात सामाजिक संतुलन बिघडण्याचा इरादा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

दरम्यान, भटक्या श्वानावर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी अक्षय म्हसे याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.