Pimpri : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बस चालकाने विनाकारण एका व्यक्तीला लोखंडी स्टॅमीने मारहाण केली. याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी सहाच्या सुमारास वल्लभनगर येथे घडली.

सुधीर सोपान इंगळे (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 14 / 3939 या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक त्याची बस घेऊन नाशिक फाट्याकडून पिंपरीच्या दिशेने वेगाने आला. त्याने वल्लभनगर येथे आल्यानंतर बस अचानक थांबवली आणि बसमधून उतरून फिर्यादी इंगळे यांना लोखंडी स्टॅमीने मारहाण केली. त्यानंतर आरोपी बस घेऊन निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.