Chinchwad : किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे

तीन वेगवेगळ्या घटनांबाबत चिंचवड, दिघी, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी चिंचवड, दिघी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घटनेत आदित्य किसन जाधव (वय 22, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंक रोड चिंचवड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार किरण उर्फ करण बाळू पवार (रा. पत्राशेड झोपडपट्टी लिंक रोड चिंचवड), पप्या (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही), बाळू शालीमन पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी जाधव यांना पत्राशेड झोपडपट्टीच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमी समोरील रोडवर बोलावून घेतले. ‘तू मला शिव्या का दिल्या’ असे म्हणत आरोपींनी जाधव यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये आरोपींनी जाधव यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. जाधव यांच्या मांडीवर, कमरेवर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू  फेकून मारला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दुसरा प्रकार दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणीनगर देवाची आळंदी येथे घडला. याप्रकरणी सतीश बाळासाहेब जाधव (वय 35, रा. देवाची आळंदी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रमेश चव्हाण (रा. डुडुळगाव) व अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी जाधव यांना ‘माझ्याकडे हप्ता मागतोस’ असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत दगडाने मारले. यामध्ये जाधव जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत इकबाल हुसेन साहब हवालदार (वय 32, रा. चक्रपाणी चौक भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष माने (वय 25) आणि अन्य एकजणा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हवालदार त्यांच्या पत्नीसोबत घरी जेवण करत होते. त्यावेळी आरोपी बेकायदेशीररित्या घरात घुसले. त्यांनी हवालदार आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.