Bavdhan Crime News : नपुंसक असल्याचे लपवत लग्न करुन फसवणुक केल्याप्रकरणी पती व सासुवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – नपुंसक असल्याचे लपवून लग्न केले तसेच, शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान, बावधन येथे हा प्रकार घडला. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी पिडित महिलेनं शुक्रवारी (दि.02) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती व सासुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने नपुंसक असल्याचे लपवून फिर्यादी महिलेशी विवाह केला. तसेच, आरोपी पती आणि सासुने तिला धमकावत शारीरिक व मानसिक छळ केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.