Sangvi : हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्या प्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेराहून हुंडा आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पतीवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश लक्ष्मण केंगले (रा. औंध हॉस्पीटल सरकारी वसाहत, पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या 29 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांना माहेरहून हुंडा आणण्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करत होता. तसेच तू माझ्यासोबत राहू नकोस, असे म्हणून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळेल्या विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.