Crime News : हुंड्याची मागणी करत गर्भपात करणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – हुंड्यासाठी छळ करत विवाहितेला तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करणाऱ्या सासरच्या मंडळीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 नोव्हेबर 2020 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला.

 

विवाहितेने पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुरुवारी (दि.18) फिर्याद दिली असून पाच जणांविरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला आमच्या मनासारखे लग्न झाले नाही, आमचा मानपान झाला नाही म्हणत विवाहितेचा छळ केला.दरम्यान फिर्यादी गर्भवती असताना डोकेदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी दिली व गर्भपात केला.तसेच विवाहितेच्या बेडरुममध्ये मंतरलेले लिंबू व जोदु टोण्याच्या वस्तू ठेऊन फिर्यादिला भिती दाखवली. तसेच फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. विवाहितेच्या  दिरानेही तिच्याशी गैरव्यवहार करत विवाहितेचा विनयभंग केला.याबरोबरच विवाहितेला माहेरून 4 तोळे सोन्याची मागणी केली.यावरून आरोपींवर विवाहितेचा छळ, बेकादेशीर गर्भपात करणे, विनयभंग, हुंड्याची मागणी, जादुटोणा करणे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.