Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी महावितरणच्या अधिका-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लाईटच्या कामानिमित्त महिलेने महावितरण कार्यालयात फोन केला. त्याद्वारे महावितरणच्या एका अधिका-याने महिलेशी ओळख वाढवून तिच्या दुकानात जाऊन तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रांत वरूडे, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वरूडे हा महावितरण कंपनीतील चिखली येथील कार्यालयात कामाला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये फिर्यादी महिलेने लाइटबाबत तक्रार करण्यासाठी आरोपी वरूडे याला फोन केला होता. त्यानंतर वरूडे याने फोन आणि व्हॉटस्‌ऍपद्वारे महिलेशी ओळख वाढविली. फिर्यादीच्या दुकानासमोरून येता-जाता पाहून पाठलाग केला. नोव्हेंबर 2019 मध्ये फिर्यादीच्या दुकानात जाऊन बसला. त्यानंतर पीडित महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केला असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.